खूनाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला असून आपल्याविरूद्धचे खूनाचे कलम हटवावे, अशी आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. राजापूर-कोदवली येथे गाडीखाली चिरडून वारिशे यांचा खून केल्याचा आरोप आंबेरकर याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच त्या संबंधीचे दोषारोपपत्रही पोलिसांनी न्यायालयापुढे ठेवले आहे. दरम्यान आपण निर्दोष असून खूनाचे कलम हटविण्यासाठी आंबेरकर याने सत्र न्यायालयापुढे अर्ज केला होता.www.konkantoday.com