ईदनिमित्त शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार
_रमजान ईद गुरुवारी (दि. 11 एप्रिल) साजरी होणार असल्यास या दिवशी रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा दर सोमवार आणि गुरुवारी बंद ठेवला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात गुरुवारी 1.529 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणाची साठवण क्षमता 4.371 दशलक्ष घनमीटर असून, गुरुवारी धरणात 1.529 दशलक्ष घनमीटर साठा आहे. धरणाचे पाणी नियमित पावसाळा सुरु होईपर्यंत पुरवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच दर सोमवार आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु रमजान ईद गुरुवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे.चंद्रदर्शनानुसार ही ईद 10 एप्रिल बुधवारी किंवा गुरुवारी साजरी करण्याच्या सूचना होणार आहे. गुरुवारी रमजान ईद होणार असेल तर या दिवशी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा करण्याची तयारी रत्नागिरी नगर परिषदेकडून ठेवण्यात आली आहे.www.konkantoday.com