आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कोकणातील ७ जिल्ह्यातील युवकांना स्कूबा डायव्हिंग व बोट चालविण्याचे प्रशिक्षण
__आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कोकणातील ७ जिल्ह्यातील युवकांनी स्कूबा डायव्हिंग व बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ५५ लाख ७७ हजारांचा निधी मंजूर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग ऍक्वॅटिक स्पोर्टस अर्थात आयआयएसडीए या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सिंधुदुर्ग येथील आयआयएसडीए या संस्थेत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील १० याप्रमाणे ३६० युवकांना स्कूबा डायव्हिंग व बोट चालविण्याचे प्रशिक्षण आणि यातील विशेष योग्यता असलेल्या ३६ युवकांना डायव्हिंग मास्टर प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव सदर करण्यात आला होता. मात्र तांत्रिक समितीच्या सभेत मार्च २०२३ मध्ये प्रारंभी केवळ कोकणातील ७ जिल्ह्यांसाठीच हे प्रशिक्षण आयोजित करावे, असे ठरविण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील १० व त्यातील डाईव्ह मास्टर्ससाठी ७ अशा ७७ युवकांच्या प्रशिक्षणासाठी ६१ लाख ९६ हजार ९७४ रुपयांचा फेरप्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार निधी वितरणास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.www.konkantoday.com