अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेकडून जाहिरात प्रसिद्ध , जाहिरातीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
_सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेकडून जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहेजितेंद्र आव्हाडांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देताना अजित पवार गटाकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचे म्हटले आहेआव्हाड यांनी अजित पवार गटाची जाहिरात पोस्ट केली आहे. ते म्हणतात, “अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना अतिशय स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आज्ञाभंग असून, न्यायालयाचा अवमान आहे”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.www.konkantoday.com