डॉक्टर अभिजीत बीचुकले नव्या दमाने लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज
अभिजीत बिचुकले दरवेळेस नव्या दमाने निवडणुकीची तयारी करतात. यावेळेस त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. कसब्याच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाची चर्चा सुरु होती. त्यावेळेस दुसरीकडे अभिजीत बिचुकलेंना किती मतं मिळाली? असा प्रश्न विचारणारेही अनेकजण होते. कसबा पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना तब्बल 47 मते मिळाली होती. तरीही त्यांच्या आत्मविश्वासात कसुभरही कमतरता आली नाही. आता ते पुन्हा सज्ज झाले आहेत. अभिजीत बीचुकले आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. विशेष म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले सातारकर आता डॉक्टर अभिजीत बीचुकले झाले आहेत. त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट काम करण्यात आली आहे. त्याच आनंदात त्यांनी निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीये. आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची हे अद्याप बिचुकलेंचं ठरलेलं नाहीये. सातारा, कोल्हापूर की पुणे? यापैकी कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार?याविषयीची घोषणा आपण लवकरच करणार असल्याचे बिचुकले सांगतात. www.konkantoday.com