होळी व रंगोत्सवाचा आनंद साजरा करताना नागरिकांनी विद्युत यंत्रणेतील खांब, उपरी व भूमिगत वाहिन्या, रोहित्रे आदींपासून सुरक्षित अंतर राखावे
होळी व रंगोत्सवाचा आनंद साजरा करताना नागरिकांनी विद्युत यंत्रणेतील खांब, उपरी व भूमिगत वाहिन्या, रोहित्रे आदींपासून सुरक्षित अंतर राखावे.संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखून होळी पेटवावी. शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करावा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात होळी, रंग खेळताना वीजमीटर, वीज उपकरणे आदींचा पाण्यापासून बचाव करावा. ओल्या हाताने उपकरणे चालू वा बंद करणे टाळावे. आपत्कालिन स्थितीत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही महावितरण कंपनीने कळवले आहे.www.konkantoday.com