
एमआयडीसी हवी मात्र रिफायनरी नकोही सेनेची दुटप्पी भूमिका
राजापुरातील स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी बारसू येथील प्रस्तावित एमआयडीसीला जर शिवसेनेचा व शिवसेनेच्या उपसभापतींचा पाठिंबा असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू. मग प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुमारे एक लाख बेरोजगारांना रोजगार देणार्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध का असा सवाल भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी उपस्थित केला आहे. मात्र एमआयडीसी हवी आणि रिफायनरी नको अशी दुटप्पी भूमिका सेनेने घेऊ नये असे आवाहन गुरव यांनी केले आहे.
www.konkantoday.com