मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ,इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा
होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लाबं रांगा लागल्या आहेत.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशी अर्ध्यातच अडकून पडले आहेत . महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. महामार्गावर छोट्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.www.konkantoday.com