देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल अटल सेतूची सुरक्षा ऐरणीवर!!

अटलसेतूवर टॅक्सीतून आलेल्या मुंबईतील महिलेने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी १२ जानेवारीला सुरू झालेल्या या देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी सागरी पुलावर पोलीस गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत.या २१ किलोमीटर लांबीच्या सागरी पुलाचा उरणच्या चिर्लेपासून १४.५ किलोमीटरचा भाग न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. तर पुढील भाग मुंबईत मोडतो. पुलाचा सर्वाधिक भाग हा नवी मुंबई पोलीस हद्दीत आहे. मात्र या पुलावर न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना गस्त मारायची झाल्यास पोलिसांना थेट मुंबईत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे पुलावर थांब्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही. त्यासाठी वॉर्डन सहाय्यक देण्याची तसेच पोलिसांसाठी निवारा चौकी उभारण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे केली आहे. गस्ती वाहनांची व्यवस्था आहे. मात्र ही वाहने स्वतंत्र नाहीत ती एमएमआरडीए कर्मचारी यांच्यासह गस्त घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या असतानाही ही घटना घडली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button