कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड

_कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव नसल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे, असे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी सांगितले. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर कोकणवासीयांसाठी वाढीव गाड्या, थांबे यांच्या मागण्यांना ब्रेक लागला आहे. प्रवाशांची गैरसोय कायम राहणार आहे.कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे, यासाठी कोकण विकास समिती गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी मधल्या काळात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींना समितीकडून पत्रे देण्यात आली. याबाबत रेल्वे बोर्ड आणि कोकणातील प्रमुख नेते मंडळी यांच्यात विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्याचा ऐतिहासिक निर्णय रेल्वे बोर्ड घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र या मागणीला बराच कालावधी उलटून गेल्यामुळे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी माहिती अधिकाराखाली रखडलेले दुहेरीकरण, विलीनीकरण आणि बऱ्याच लहान-मोठ्या प्रकल्पाविषयी माहिती कोकण रेल्वेकडे मागितली होती. त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे दुहेरीकरणाबाबत तसेच मार्गावर नवीन रेल्वे स्थानकांबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे कोकण रेल्वेने आपल्या उत्तरात सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button