इंटरसेप्टर वाहनांसाठी ड्रायव्हरची गरज असल्याने त्यांची भरती आता एसटी महामंडळातून केली जाणार
राज्यातील वाढते रस्ते अपघात पाहून राज्य सरकारने नुकतेच आरटीओच्या ताफ्यात तब्बल 187 इंटरसेप्टर वाहनांची तैनाती केली. या इंटरसेप्टर वाहनांमध्ये वाहनांचा वेग मोजणार स्पीडगन देखील असल्याने बेफाम वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यास मदत मिळणार आहे.आता या 187 इंटरसेप्टर वाहनांसाठी ड्रायव्हरची गरज असल्याने त्यांची भरती आता एसटी महामंडळातून केली जाणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील चालकांची संख्या कमी होऊन वाहतूक फेऱ्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यातील परिवहन विभागाने अलिकडेच 187 इंटरसेप्टर वाहने आरटीओच्या वायूवेग पथकाच्या ताब्यात सोपविण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या 187 इंटर सेप्टर वाहनांमध्ये स्पीडगन सह अनेक सुविधा असल्याने हायवेवर गस्त घालण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. ही वाहने राज्यभरातील आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या वाहनांना चालक नसल्याने आता एसटी महामंडळातील वाहन चालकांनी आरटीओमध्ये प्रतिनियुक्तीवर घेतले जाणार आहे.
www.konkantoday.com