सगळं काही संपलं असं वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा-स्मिता शिरोळे-यादव

_सगळं काही संपलं असं वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा, कारण पुरंदरच्या तहामध्ये २३ किल्ले दिल्यानंतर सगळं स्वराज्य संपलं असं वाटत होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आशा व कर्तृत्व जिवंत होते. आयुष्यात अशीच जिद्द ठेवा विजयाचा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही,’ असं प्रतिपादन रोईंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या महिला खेळाडू स्मिता शिरोळे-यादव यांनी केले.डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या डेरवण युथ गेम्स स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी उद्योजक कमलेश जोशी, बी.के.एल. वालावलकर हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील, स्पोर्ट्स डायरेक्टर श्रीकांत पराडकर, शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिरोळे यांनी कोकण ऑलिम्पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेरवण युथ गेम्सच्या जय्यत तयारीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील मूलभूत गरजा ओळखून एकाच ठिकाणी रुग्णसेवा, शिक्षण, क्रीडा यासारख्या विविध गोष्टी सेवाभाव ठेवून केले जाणारे संस्थेचे हे कार्य खरोखरच माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. कबड्डी, खो-खो या खेळांसाठी असणारे भव्य असे इनडोर क्रिडांगण प्रथमच पाहायला मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्या म्हणाल्या, वालावलकर संस्थेने दूरदृष्टी ठेवून डेरवणसारख्या ग्रामीण भागात सेवा-भावाचा हा रचलेला पाया हा खरोखरच आदर्शवत आहे. या भव्यदिव्य कार्याला शुभेच्छा आहेत. विद्यार्थ्यांना खेळात करिअर करण्याच्यादृष्टीने अनेक संधी आहे. शिक्षण असो की खेळ आपण शंभर टक्के योगदान दिले तर हमखास यश मिळते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button