शासकीय कार्यालयांची लाखो रुपयांचे कराची थकबाकी
सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन सुव्यवस्थेसाठी जनतेच्याच कराच्या रक्कमेतून कार्यरत असणारी शासकीय कार्यालये आणि जनतेचा कैवार घेत आम्हाला लोकसेवा करायची आहे. अशी दारोदार मतांची याचना करण्यासाठी येणारे काही पुढारी यांच्या न.प.च्या मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा सामान्य जनतेचे डोळे विस्फारणारा आहे. काही स्थानिक पुढार्यांनी तर वर्षानुवर्षे न.प.चे गाळे घेवून लाखो रूपयांचे भाडे थकविले आहे. विशेष म्हणजे यातील काहींना दुसर्या व्यक्तींच्या नावे गाळे घेवून मखलाशी केली असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सर्वसामान्य जनता मात्र विहित वेळेत कर भरून आपले कर्तव्य अंगिकारताना दिसत आहे. त्यांच्या मागे मात्र न.प. प्रशसनाचा ससेमिरा लागलेला असतो, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.www.konkantoday.com