
लांजा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताचा जामीन फेटाळला
लांजा येथे १४ वर्षीय मुलीच्या तोंडात टॉवेल कोंबून तिच्याशी शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायायाने फेटाळून लावला. संदीप दत्ताराम काटकर (३०, रा. लांजा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध लांजा पोलिसांकडून भादंवि कलम ३७६ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून संशयिताला अटक करण्यात आली होती. न्यायायीन कोठडीत असलेल्या संदीप याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. www.konkantoday.com