
लांजा तालुक्यातील देवधेत वणव्यात आंबा, काजूच्या बागांचे नुकसान
वणव्यामुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात आंबा व काजू कलमे होरपळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना २० मार्च रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास लांजा तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी, बौद्धवाडी व गुरववाडी या ठिकाणी घडली.देवधे मणचेकरवाडी व गुरववाडी या परिसरातून महावितरण कंपनीची हाय व्होल्टेजची थ्री फेज लाईन गेली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटने वणवे लागून येथील आंबा, काजू बागांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ११ मार्च रोजी अशा प्रकारे वणव्यामुळे येथील आंबा व काजू कलमांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी देवधे येथी शिवसेना (शिंदे गट) उपविभागप्रमुख महेश गुरव यांनी महातिरणच्या लांजा उपविभाग कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. www.konkantoday.com