
राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी व त्यांच्या पत्नी यांची गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी
_रत्नागिरी:- राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी व त्यांच्या पत्नी यांची गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात आली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात साडेतीन कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल असून, या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर आम . साळवी यांचे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी तसेच त्यांच्या पत्नी यांची रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात आली. www.konkantoday.com