मुंबई-गोवा महामार्गावरील पादचारी भुयारी मार्ग की नाला
_मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी ते खोपी या ठिकाणी करण्यात आलेेले बॉक्स कन्व्हर्ट कम पादचारी भुयारी मार्ग आश्चर्यकारक बनवले गेले असुन हे भुयारी मार्ग आहेत की, नाला असा प्रश्न पडला आहे. या कामाची चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांनी महामार्ग बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे. अशा प्रकारे केवळ माणसे चालणे सोड फक्त गटारांचे पाणीच जावू शकते असे पादचारी भुयारी मार्ग बनवणाया अभियंत्यांचा शासनाने सत्कार केला पाहिजे, अशी उपरोधिक मागणीदेखी त्यांनी केली आहे.कशेडी येथील परशुराम घाट या मुंबई-गोवा महामार्गाच्या टप्प्यामध्ये खवटी ते खोपी फाटा या दरम्यान मौजे सतीचा कोंड मौजे शिंदेवाडी तसेच जाधववाडी या ठिकाणी बॉक्स कन्व्हर्ट कम पादचारी भुयारी मार्ग झाले आहेत. त्याचे काम अजूनही सुरू आहे. १२ फूट ते १५ फूट तसेच १५ फूट बाय १५ फूट अशा प्रकारचे झाल्याने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम भिागाने माहितीचे अधिकाराखाली सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांना माहिती दिली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचे रूपेश पवार यांनी सांगितले. www.konkantoday.com