
भाजपच्या नेते मंडळींना कोकण उध्वस्त करायचा आहे, खा. विनायक राऊत यांचा आरोप
भाजपाच्या तथाकथित पुढार्यांकडून या ठिकाणी आणले जाणारे संकट टाळण्यासाठी शिवसेना ताकदीने लढा देणार असल्याचे रत्नागिरी-सिंधुुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. सर्वसामान्यांसाठी न्यायालयीन लढाईसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सक्षमपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपा नेतेमंडळींचा कोकण उध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याप्रमाणे सिडकोचे संकटही अद्याप दूर गेलेले नसल्याचेही खासदार राऊत यांनी रत्नागिरीत बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर साई रिसॉर्टवरील कारवाई ही वरवर दिसत असली तरी आता उच्च न्यायालयाने किनार्यावरीलल सीआरझेडअंतर्गत येणार्यांचा अहवाल मागवल्याने गरिबांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com