भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी याला आरएचपी फाउंडेशनचा मदतीचा हात
रत्नागिरी:वरुण विश्वनाथ गोसावी (रा. भांबेड ता. लांजा)याला आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर देण्यात आली.व्हिलचेअर दिल्याबद्दल वरुणच्या आईवडीलांनी आणी त्याच्या कुटुंबियांनी आरएचपी फाउंडेशनचे विशेष अभार मानले.वरुणचा आठ महिन्यांपूर्वी झाडावरुन पडुन अपघात झाला. केबलचे काम करण्यासाठी गावी आले होते. काम करताना चक्कर येऊन पडल्याने पाठीच्या मणक्याला मार लागला. तीन मणके फ्रॅक्चर झाले. कोल्हापूरला ॲस्टर आधार हॉस्पीटलमधे मणक्यावर ऑपरेशन झाले. पण कमरेपासून खाली सर्व संवेदना बंद झाल्या. युरीन मोशन कंट्रोल गेले. गेले आठ महिन्यापासून घरीच बेडवर झोपून आहेत. सीटला बेडसोअर असल्याने बसता येत नाही. पाठीचा बॅलन्स जातो. घरच्यांच्या मदतीने उठून बसावे लागते. सर्व विधी बेडवरच घरच्यांच्या मदतीने करावे लागतात.वरुण गोसावी यांचे लग्न झाले असून पत्नी व मुलगी त्यांच्यासोबत राहतात. वरुण गोसावी हे मुंबईत खासगी कंपनीमधे वायरमन म्हणून कामाला होते. परंतु गावी कामासाठी आले आणि दुर्दैवाने त्यांना अपंगत्व आले. त्यांच्या औषधोपचारांसाठी लाखो रुपये खर्ची पडले पण काही उपयोग झाला नाही. त्यांच्या या आजारची माहिती रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादीकभाई नाकाडे यांना समजली. त्यांनी वरुणची भेट घेतली. त्याची विचारपूस केली. त्याचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे आणि त्याच्या घरच्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी वरुणच्या सोईची व्हीलचेअर हवी. श्री सादिक नाकाडेंनी व्हीलचेअरसाठी अवाहन केले त्या अवाहनाला साद देवुन रत्नागीरीच्या पी डब्ल्यु डी मधे कार्यरत असलेल्या सौ.वैशाली नारकर यांनी मदतीचा हात पुढे केला.त्यांनी त्यांचे वडील कै.मुकुंद राम गांधी यांच्या स्मरणार्थ व्हीलचेअर डोनेट केली.व्हीलचेअर वाटप करते वेळी सौ.वैशाली नारकर,भाउ संकेत मुकुंद गांधी,तन्वी विश्वास खातु,आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादीक नाकाडे,सदस्य श्री समीर नाकाडे,प्रिया बेर्डे तसेच वरुण गोसावी आणि त्याचे भावोजी श्री प्रमोद गुरव उपस्थित होते.www.konkantoday.com