
चिपळूण नगर परिषदेने इतर संस्थाना डावलून कबड्डी स्पर्धेला दिले ३ लाखांचे अनुदान
नगर परिषदेतर्फे दरवर्षी २ टक्के अनुदानातून शहरातील विविध संस्थांना अनुदान वाटप केले जाते. मात्र यावर्षी तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी कबड्डी स्पर्धेसाठी चक्क ३ लाख रूपयांचा निधी दिला. त्यामुळे अन्य तुटपुंजी रक्कम उरली अस्याने अन्य ५० संस्थांना १० ते ५५ हजार रुपयांचे तुटपुंजे अनुदान वाटले जात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.नगर परिषद २ टक्के अनुदान शहरात सामाजिक काम करणार्या संस्थांना देत असते. बर्याचदा २ टक्के होणारी रक्कम लक्षात घेवून संस्थांच्या कामाचा विस्तार पाहून कमी जास्त प्रमाणात अनुदान दिे जाते. लोकप्रतिनिधी कार्यरत असताना काहीवेळा वशिलेबाजीही होताना दिसत होती. मात्र यावर्षी तशी वशिलेबाजी करण्यासाठी लोकप्रतिनिधी नव्हते. त्यामुळे याचे सर्व अधिकारी तत्कालीन मुख्याधिकारी शिंगटे यांच्याकडे होते. त्यामुळे याच अधिकाराातून ते एका मंडळाच्या कबड्डी स्पर्धांवर भलतेच खूष झाले. त्यांनी यावर्षी १० लाख रूपये रक्कम असून त्यातून अनुदान मिळावे म्हणून सुमारे ५४ संस्थांनी अर्ज केले आहेत. याचा विचार न करता या कबड्डी स्पर्धेला तब्बल ३ लाख रुपये दिले. त्यामुळे केवळ ७ लाख उरले व त्यातून पात्र ठरलेल्या तब्बल ० संस्थांना अनुदान द्यायचे होते. www.konkantoday.com