
चिपळुणातील नव्या जॅकवेलसाठी विशेष मान्यता द्या, चिपळूण नगर परिषदेची मागणी
गोवळकोटसह अर्ध्या शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी गांधारेश्वर येथे बांधल्या जाणार्या जॅकवेल कामाला विशेष मान्यता द्याा, अशी मागणी नगर परिषदेने जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने त्यात हे काम अडकू नये यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून परवानगी सांगण्यात आली आहे. ती मिळाल्यास कामाला तातडीने सुरूवात होणार आहे.गोवळकोट, गोवळकोट रोड, उक्ताड, बाजारपेठ व पेठमाप येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने गोवळकोट येथे वाशिष्ठी नदीत जॅकवेल बांधली आहे. पूर्वी नदीला भरपूर पाणी असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत नव्हत्या. मात्र आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच वीजनिर्मिती कमी होत असल्याने नदीत सोडल्या जाणार्या पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे गोवळकोट येथील जॅकवेल समस्यांच्यया गर्तेत अडकली असुन या जॅकवेलकडे वाशिष्ठी नदीचे पाणीच जात नसल्याने खाडीचे भरतीचे पाणी जॅकवेलकडे येत असल्याने अधूनमधून वरील भागांना खारट, मचूळ व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे नागरिक सातत्याने चांगलले पाणी देण्याची मागणी करीत आहेत. www.konkantoday.com