खासदारकीचा मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर मी गेली १० वर्षे जनकल्याणसाठी केला-विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी,- खासदारकीचा मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर मी गेली १० वर्षे जनकल्याणसाठी केला याचे मला समाधान आहे. त्यामुळे माझ्या विरोधात कमीत कमी मताने कोणता उमेदवार पडेल, याची चाचपणी विरोधक करत असल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विरोधकांना लगावला.इंडिया महविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि ठाकरे शिवसेनेचे खासदार राऊत यांच्या येथील मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते फीत कापून आणि आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रवीण भोसले, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँगेसच्या कोकण विभागीय महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे, विकास सावंत, सतीश सावंत, जयेंद्र परुळेकर, जान्हवी सावंत, संग्राम प्रभुगावकर, अनंत पिळणकर, नागेंद्र परब, सुशांत नाईक, सुकन्या नरसुले उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button