
उन्हाळयामुळे तहानलेल्या हत्तीने पाण्यासाठी घेतली भरवस्तीत धाव
दोडामार्ग केर परिसरात वास्तव्याला असलेल्या टस्करने पिल्लांसह आता आपले बस्तान हेवाळे परिसरात बसवले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हे हत्ती भरवस्तीत शिरले. तहान लागल्यामुळे व्याकुळ झालेल्या या गजराजाने एका घराशेजारील बॅरलमधील पाण्याने आपी तहान भागवली. मात्र तो निघून जाईपर्यंत स्थानिक ग्रामस्थ जीव मुठीत धरून होते.तिलारी खोर्यात जंगली हत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बागायतींचे नुकसान तर सुरू आहेच. आता तर ते थेट लोकवस्तीत घुसत असल्याने लोकांचे जगणे मुश्कील होवून बसले आहे. सोमवारी असाच प्रकार हेवाळे गौतमवाडी परिसरात घडला. टस्कर भरदुपारी थेट घराच्या अंगणातच आला. हेवाळकर यांच्या घराच्या अंगणातील बॅरलमधील पाणी पिऊन त्याने आपली तहान भागवली. मात्र तोवर त्या हेवाळकर कुटुंबीय व अन्य स्थानिक ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेल्यावरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. www.konkantoday.com