आता दहावीच्या विज्ञान भाग- एकच्या त्या प्रश्नाचे उत्तर लिहिलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट एक गुण दिला जाणार

_इयत्ता दहावीच्या परीक्षेत विज्ञान भाग-एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान अणू कशाचा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर काहींनी हेलियम तर काहींनी हायड्रोजन लिहिले आहे.दोन्ही उत्तरे बरोबर असल्याने यापैकी एक जरी उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिले असल्यास त्याला एक गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.बोर्डाची बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली असून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इतिहास व भूगोल विषयाचे पेपर झालेले नाहीत. दरम्यान, यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने बऱ्याच उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे मागील परीक्षांच्या प्रमाणात या परीक्षेत कॉपी प्रकरणांत घट झाली आहे. आता परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु झाली आहे. सुरवातीला शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता, पण तो दूर करून आता उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु झाली आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असे बोर्डाचे नियोजन आहे. आता दहावीच्या विज्ञान भाग- एकच्या त्या प्रश्नाचे उत्तर हेलियम किंवा हायड्रोजन यापैकी एक लिहिलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट एक गुण दिला जाणार आहे. मात्र, उत्तर न लिहिलेल्यांना गुण मिळणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button