व्हाॅट्सॲप वर “विकसित भारतचे” मेसेज पाठवणे थांबवा; निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘विकसित भारत’ मॅसेज पाठवणे तात्काळ थांबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. तसेच आयटी मंत्रालयाकडून या संदर्भात अहवाल मागितला आहे. सार्वत्रिक निवडणूक आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा होऊनही नागरिकांच्या फोनवर सरकारच्या उपक्रमांची माहिती देणारे मॅसेज येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासोबत जारी करण्यात आलेले मॅसेज १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले. परंतु, काही ठिकाणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे तो काहींना उशिरा मिळत आहे, अशी माहिती मंत्रालयाने आयोगाला दिली होती. लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा आणि आचारसंहिता लागू असतानाही सरकारच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकणारे असे मॅसेज अजूनही सर्वसामान्यांच्या फोनवर पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या मेसेजवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला कारवाई करण्याची विनंती केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button