
रत्नागिरी शहरातील दोन्ही बस स्थानकांच्या दुरुस्तीमुळे प्रवासी आले रस्त्यावर
_रत्नागिरी शहरातील मुख्य हायटेक एसटी बसस्थानकाचे काम सुरू असल्याने संपूर्ण एसटी वाहतूक रहाटाघर येथून सुरू आहे. परंतु रहाटाघरची देखील दूरवस्था झाली आहे. येथे सुविधांची प्रचंड वानवा होती. प्रवाशांच्या तक्रारी होत्या. सांडपाण्याचा प्रश्न, शौचालयांची झालेली दयनीय अवस्था यामुळे हे बसस्थानक वारंवार चर्चेत होते. सांडपाण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरी हा प्रश्न सुटला नाही. वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे अखेर एमआयडीसीच्या अर्थसहाय्यातून या बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाले. कोट्यवधी रुपये खर्च करून इमारत दुरुस्ती सुरू आहे. बसस्थानकाचे कॉंक्रिटीकरण, परिसर सुशोभीकरण आदी कामाने वेग घेतला आहे. यामुळे रहाटाघर कात टाकणार आहे. परंतु कॉंक्रिटीकरणामुळे बसस्थानकात येणाऱ्या सर्व गाड्या बाहेर लावण्यात येत आहेत. फलाटावर कोणती गाडी कुठून सुटणार आहे, याची माहिती होते. परंतु आता या गाड्या रस्त्यावरून सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.रहाटघर एसटी बसस्थानकाची दूरवस्था झाली आहे. येथील सांडपाण्याचा प्रश्न, शौचालयाची अवस्था गंभीर आहे. सध्या बसस्थानकात खडी पसरल्याने एसटी बस स्थानकाबाहेरूनच सोडल्या जातात. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.www.konkantoday.com