
मासेमारी बोटीसाठी व आंबा बागेच्या राखणीसाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात नेपाळी खलाशी, गुरखे दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी व आंबा बागेच्या राखणीसाठी येणार्या नेपाळी कामगारांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. चालू मच्छिमार हंगाम जिल्ह्यात अडीच हजार खलाशांची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी हा आकडा दीड हजार इतका होता. तर आंबा बागांमध्ये राखणीसाठी नेपाळी गुरख्यांनाच पसंती मिळत असून गेल्या काही दिवसांमध्ये यामध्ये वाढ होत असून एकूण अडीच हजाराहून अधिक नेपाळींची नोंद करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याच्या झाडांना पालवी फुटण्यास सुरूवात झाली आहे. नोव्हेंबर अखेरीस कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळ यावर्षी आंबा कलमे चांगली मोहरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंबा बागेची राखण करण्यासाठी यावर्षीही गुरख्यांनाच पसंती दिली जात आहे. ट्रेनच्या माध्यमातून हे गुरखे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी या गुरख्यांनी रोजगार मिळवला आहे.त्याचप्रमाणे खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी नेपाळी कामगार उपयुक्त असल्याने या कामगारांची मागणी स्थानिक मच्छिमारांकडून करण्यात येते. तसेच स्थानिक तरूण खलाशाचे काम करण्यात उत्सूक नसल्याचेही मच्छिमार बोट मालकांकडून सांगण्यात येते. www.konkantoday.com