
पाणी टंचाई असताना देखील चिपळुणात नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय
चिपळूण शहरातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे काही नागरिक व व्यावसायिक रस्त्यावर पाणी भरण्याचा प्रताप करीत आहेत. धुळीपासून बचाव करण्यासाठी ते हा प्रकार करीत असले तरी त्यामुळे पाणी वाया जात आहे. नगर परिषदेने अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.गतवर्षी पाऊस कमी पडल्याने साहजिकच त्याचा परिणाम वाशिष्ठ व शिवनदीच्या पाणीपातळीवर झाला आहे. वीजनिर्मितीनंतर तितकेसे पाणी सोडल जात नसल्याने अनेकदा वाशिष्ठी कोरडी पडल्याचे चित्र पहायला मिळते. याचा परिणाम शहरासह नजिकच्या मिरजोळी, कोंढे, शिरळ आदी गावांच्या पाणी योजनांवर झाला असून नागरिकांना पाणी कधी येते याकडे डोळे लागून बसावे लागत आहे. www.konkantoday.com