धनगर समाज महासंघ रत्नागिरी युवक आघाडी अध्यक्षपदी समीर आखाडे यांची निवड

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रत्नागिरी युवक आघाडीच्या अध्यक्षपदी समीर आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षे धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी समीर आखाडे कार्यरत आहेत. समाजाचे हित जोपासण्यासाठी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असतात. धनगर समाजाचे संवर्धन व समाजहिताचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेदू, प्रांतभेद, भाषाभेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करून घेवून आपल्या आजपर्यंतच्या समाजसेवेचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी विस्तारित कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे असे संघटनेकडून आखाडे यांना सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button