देवरूख येथे रत्नागिरी जिल्ह्यातील हुतात्मा जवान स्मृतिस्थळाचे २३ रोजी लोकार्पण
उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता भारतीय सैनिक अहोरात्र देशाची सेवा करत आहेत. यामुळे प्रत्येक नागरिक बिनधास्तपणे व देशसेवा करताना अनेक सैनिक शहीद देखील होत आहेत. हुतात्मा सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातील हुतात्मा सैनिकांचे स्मृतिस्थळ उभारले आहे. याचा लोकार्पण सोहळा २३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे.लेफ्टनंट जनरल विश्वास भट व बालाकोट एअर स्ट्राईकचे रचनाकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाना देशसेवेची आवड निर्माण व्हावी, शहीद जवानांना आदरांजली वाहता यावी यासाठी देवरुख येथे शहीद जवान स्मारक व परमवीरचक्र दालन प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामध्ये युद्धात वापरण्यात आलेल्या रणगाडा, विमान, जीप, युद्धनौकेची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. आज प्रत्येकजण या ठिकाणाला भेट देवून नतमस्तक होतो. प्रकल्पामध्ये हुतात्मा सैनिकांचे स्मृतीस्थळ तयार करण्यात आले आहे.www.konkantoday.com