चिपळूण नगरपालिकेने करवसुलीचा वेग वाढविला, आतापर्यंत ९ कोटी ५२ लाखांची कर वसुली

मार्च महिना संपत आल्याने नगर परिषदेने थकित कर वसुलीचा वेग आणखीन वाढवला आहे. यातूनच आतापर्यंत पाणी व घरपट्टीची मिळून ९ कोटी ५२ लाख ४० हजार ७४५ रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण ६० टक्के आहे. तर थकबाकी असलेल्या ४५ जणांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.नगर परिषदेला मालमत्ता करातून चालू व थकित मिळून सुमारे १५ कोटी ३९ लाख २७ हजार ५८३ रुपये तर पाणीपट्टी करातून चालू वर्षी व मागील थकबाकी मिळून सुमारे २ कोटी ४५ लाख ८८ हजार १३३ रुपये येणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत मालमत्ता कराची दोन्ही मिळून ८ कोटी ७२ लाख ४० हजार ७४५ तर पाणीपट्टीचे दोन्ही मिळून ८० लाख रुपये वसूल झाले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button