
गुहागर वेळणेश्वर येथे पांढर्या वाळूचा अवैधरित्या उपसा
पर्यटनामध्ये नावलौकिक मिळत असलेल्या गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी वाडी खाते वैतरणी नदी व मंदिरामागील मठ परिसरात मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने पांढर्या वाळूचा अवैध उपस करून चोरी केली जात आहे. येथील या व्यवसायाने परिसरात दसरा निर्माण केला असून वजनदार व्यक्तींमुळे ज्यांच्या वाडीतून रस्ते तयार केले आहेत ते या व्यवसायाच्या दहशतीमध्ये वावरत असल्याची चर्चा आहे.तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनार्यावर वाळू उपसा जोरदार सुरू आहे. दोन डंपर व दोन मध्यम वाहनाद्वारे हजारो ब्रास पांढरी वाळू महसूल विभागाला आव्हान देत अवैधपणे चोरून नेली जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.www.konkantoday.com