आता ऑनलाईन वरही मिळतील शेण्याच्या गोवऱ्या
ऑनलाईन कंपन्यांच्या साईटवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, कपडे, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तूंप्रमाणेच आता शेणाच्या गोवऱ्याही ऑनलाईन शॉपिंगवर विकत मिळत आहेत.सणासुदीच्या काळात तर या ऑनलाईन शॉपिंगमध्ये सवलत दिली जाते. तसेच विविध प्रकारच्या ऑफर्स या काळात दिल्या जातात. सर्वच ठिकाणी ऑनलाईन शॉपिंगवाल्यांनी आता अनेकांना भुरळ घातली आहे. मात्र, या साईटवर आता शेणाच्या गोवऱ्याही विकत मिळतात. त्यामुळे या गोवऱ्यांना चांगली मागणी आहे. तसेच पावसाळी व इतर हंगामांमध्ये चूल पेटवण्यासाठी वापर करता येईल. गोवऱ्यांचा होमहवनासाठीही वापर केला जात आहे. या गोवऱ्या आता पॅकींगमधून घरापर्यंत पोहोचत आहेत. त्या कुठल्याही ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवर खरेदी करता येऊ शकतात. फक्त एवढेच आहे की गोवऱ्यांच्या साईजप्रमाणे गोवऱ्यांची किंमत आकारली गेली आहे. साधारणतः ५ इंचाची १८ गोवऱ्यांची किंमत २८० आहे. गोवऱ्यांच्या साईजप्रमाणे गोवऱ्यांची किंमत आहे काऊ डंग केक’ या साइटवर गोवऱ्यां उपलब्ध आहेतwww.konkanyoday.com