
अमली पदार्थ गांजाचे सेवन करुन नशेत पडलेल्या सावंतवाडीतील प्राथमिक शिक्षकाला कुडाळ पोलिसांनी अटक केली.
अमली पदार्थ गांजाचे सेवन करुन नशेत पडलेल्या सावंतवाडीतील प्राथमिक शिक्षकाला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई – गोवा महामार्गावर झाराप येथे शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.कुडाळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद शिक्षकाला अटक केली आहे.विनायक रामचंद्र पाटील (वय ३४, रा. चंदगड, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मुंबई – गोवा महामार्ग वरील झाराप येथे पेट्रोलपंपाजवळ एक व्यक्ती नशेत पडल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता संशयित पाटील नशेत पडल्याचे आढळून आले.पोलिसांनी संशयित शिक्षक पाटील यांना येथे काय करताय अशी विचारणा केली असता गांजा ओढतोय, असे उत्तरे त्याने दिले. पोलिसांनी पाटील यांच्या विरोधात अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक विनायक रामचंद्र पाटील सावंतवाडीतील एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ममता जाधव करत आहेत.