नांदेड , परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना आज सकाळी भूकंपाचे तीन सौम्य धक्के
नांदेड , परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना आज सकाळी ६ वा ५ मिनिट ते ६ वा २४ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. दरम्यान, बीड जिह्यातील काही भागांत देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती आहे.अचानक धरणीकंप जाणवल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडले.
दरम्यान, या भूकंपाची ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर वरील पांग्रा शिंदे गावात दाखवला जात आहे.
www.konkantoday.com