अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सद्गुरुंच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता आणि उलट्या होत होत्या. १७ मार्च या दिवशी त्यांना दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंत डॉ. विनीत सुरी यांनी त्यांची तपासणी केली आणि एमआरआय करण्याचा सल्ला दिला. एमआरआयच्या अहवालात त्यांच्या मेंदूला सूज आल्याचं आणि रक्तस्त्राव झाल्याचं आढळलं होतं. ज्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सद्गुरुंची पहिली प्रतिक्रिया*’अपोलो रुग्णालयात माझ्या मेंदूवर शस्त्रक्रिया पार पडली. माझ्या मेंदूमध्ये डॉक्टरांनी गाठ किंवा काही सापडतं आहे का? हे तपासलं पण त्यांना ते आढळून आलं नाही. त्यानंतर माझी शस्त्रक्रिया पार पडली. माझ्या मेंदूला कुठलीही इजा झालेली नाही’ असं सद्गुरुंनी हसत हसत सांगितलं.*आज पार पडली शस्त्रक्रिया*आज (२० मार्च) दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील डॉ. विनित सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर सद्गुरु यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. नरसिंहन यांच्या अपडेटनुसार, शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मेंदू, शरीर आणि महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये चांगल्या सुधारणा होत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button