लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -12 हजार 544 पोस्टर्स, बॅनर्स उतरवले कणकवलीत 10 लाख तर सावंतवाडीत 4 लाख 22 हजार 750 रुपयांचे मद्य जप्त- आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्ती किरण पुजार
**रत्नागिरी, दि. 19 : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवरील 12 हजार 544 वाॕल राईटिंग, पोस्टर्स, बॅनर्स आणि इतर साहित्य उतरवण्याची, झाकण्याची कार्यवाही करण्यात आली. कणकवली येथे स्थायी निगरानी पथक (एसएसटी) ने 10 लाखांची कॅश जप्त केली. तर, सावंतवाडी येथे 4 लाख 22 हजार 450 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. विधानसभा मतदार संघनिहाय करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे. 265 चिपळूण – शासकीय मालमत्ता – अनुक्रमे वॉल रायटिंग 288, पोस्टर्स 192, बॅनर्स 334, इतर 634.266 रत्नागिरी –331, 192, 332, 310. 267 राजापूर – 89, 151, 404, 524. 268 कणकवली – 0, 43, 338, 368. 269 कुडाळ – 0, 11, 224, 0, 235. 270 सावतंवाडी – 128, 212, 429, 350. सार्वजनिक मालमत्ता – 265 चिपळूण – अनुक्रमे वॉल रायटिंग 210, पोस्टर्स 150, बॅनर्स 211, इतर 589. 266 रत्नागिरी –163, 83, 45, 139. 267 राजापूर – 89, 151, 467, 651. 268 कणकवली – 2, 69, 279, 246. 269 कुडाळ – 26, 231, 337, 336. 270 सावतंवाडी – 11, 286, 435, 746. खासगी मालमत्ता – 265 चिपळूण – अनुक्रमे वॉल रायटिंग 16, पोस्टर्स 41, बॅनर्स 86, इतर 105.266 रत्नागिरी –13,18, 29, 39. 267 राजापूर – 129, 170, 545, 852. 268 कणकवली – 48, 84, 52, 33. 269 कुडाळ – 27, 246, 392, 386. 270 सावतंवाडी – 8, 48, 65, 123.www.konkantoday.com