लोकसभा निवडणुकीमुळे UPSC परीक्षा पुढे ढकलल्या

_UPSC CSE 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 26 मे रोजी होणार होती. लोकसभा निवडणुकीमुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. वास्तविक, लोकसभा निवडणुकीची तारीख आणि UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षेची तारीख सारखीच आली होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आयोगाने नवीन तारीखही जाहीर केली आहे. UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा आता 16 जून 2024 रोजी घेतली जाईल. तर UPSC CSE 2024 ची मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर ते 05 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतली जाईल. UPSC CSE 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2024 होती. अर्जातील दुरुस्तीसाठी 7 मार्च ते 13 मार्च 2024 ही मुदत देण्यात आली होती. UPSS पूर्व परीक्षेसाठी एकूण 80 केंद्रे घेतली जातील आणि मुख्य परीक्षा एकूण 24 केंद्रांवर घेतली जाईल.केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्या. लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान सात टप्प्यात होत आहे. तर निकाल 4 जूनला जाहीर होतील. त्यामुळे या दरम्यान UPSC च्या होणाऱ्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button