रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथून तरूण बेपत्ता
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथून प्रातःविधीसाठी गेलेल्या २४ वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. किल्ला परिसरात या तरूणाचा मोबाईल व चप्पल आढळून आल्या. असे असतानाही या तरूणाचा कोणताही थांगपता लागू शकलेला नाही. ग्रामस्थांकडून या तरूणाचा शोध घेण्याचे काम केले जात आहे. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित २४ वर्षीय तरूण हा सकाळी ८ च्या सुमारास प्रातःविधीसाठी गेला होता. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला आहे. www.konkantoday.com