मराठा साम्राज्याचे चलन कॉफीटेबल बुकमध्ये, चिपळुणातील गौरव लवेकर यांच्या तीन नाण्यांची निवड
छंद मानवाचे अंतर्मन प्रसन्न करतो, असं म्हणतात. त्यातच या छंदाला दाद मिळाली की, जग जिंकल्यासारखं वाटतं. शिवकालीन तब्बल आठशे नाण्यांचा संग्रह करणारा असाच एक अवलिया गौरव शेखर लवेकर चिपळूण शहरातील खेंड येथे गेली दहा वर्षे आपला छंद जोपासतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून त्यांनी ही नाणी संग्रहीत केली आहेत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकास साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने महाराष्ट्र सरकारने मराठा साम्राज्याचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली. या पुस्तकात सर्वोत्तम ४ डॉटेड शिवराई नाण्यांची छायाचित्रे निवडण्यात आली. या चार नाण्यांमध्ये तीन नाणी गौरव लवेकर यांची आहेत. www.konkantoday.com