प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, भाऊ कदम राजापूर अर्बन बँक परिवारात सहभागी
राजापूर अर्बन बँकेने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य केल्याने राज्यभरातून व्यावसायिक, उद्योजक बँकेशी जोडले जात आहेत. राजापूर तालुक्याचे सुपुत्र, प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर आणि विनोदी अभिनेते भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांनीही अर्बन बँकेचे सभासदत्व स्वीकारले असून बँक परिवारात सहभागी झाले आहेत.बँकेचे ज्येष्ठ संचालक ऍड. शशिकांत सुतार मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, मुख्याधिकारी रोहित सामंत यांनी मांजरेकर व कदम यांची मुंबई येथे भेट घेतली व त्यांना बँकेचे सभासद करून घेतले. यावेळी ऍड. शशिकांत सुतार व शेखरकुमार अहिरे यांनी मांजरेकर, कदम यांचे राजापूर अर्बन बँकेच्या वतीने स्वागत केले. यासाठी उद्योजक विलास मांजरेकर व सीए प्रसाद देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.www.konkantoday.com