चिपळूण विभागीय वनाधिकारीपदी गिरीजा देसाई यांची नेमणूक
गेल्या तीन वर्षात जिल्हा वनविभागाच्या कामकाजात आमुलाग्र बदल करणारे येथील विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांची मुंबईला बदली झाली असून त्यांच्या जागी सामाजिक वनीकरणाच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने जिल्ह्याच्या वनविभागाची जबाबदारी प्रथमच एका महिला अधिकार्याकडे आली आहे.येथील वनविभागाची सुत्रे हाती घेतल्यानंतर खाडे यांनी वनविभागाच्या कारभारात मोठी सुधारणा केली आहे.www.konkantoday.com