चिपळूण नगर पालिका मालकीचे गाळे ३० वर्षे मुदतीवर मिळणार, शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण येथील नगर पालिकेच्या मालकीचे भाजी मंडई तसेच मटण-मच्छि मार्केटमधील गाळे आता तीन वर्षांऐवजी ३० वर्ष या दीर्घ मुदतीवर मिळणार आहेत. आमदार शेखर निकम यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले आहे. अलिकडेच त्यासंदर्भातील निर्णय शासनाकडून झाला असून त्याचा फायदा शहरातील व्यावसायिकांना होणार आहे. तर गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेतही मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.चिपळूण नगर पालिकेमार्फत गाळे लिलाव प्रक्रियेत काढल्यानंतर त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे गेली दहा वर्ष शहरातील भाजी मंडई, तसेच मटण-मच्छि मार्केटमधील गाळे बंद होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button