
खेडसह लोटेत विजेचे बिल थकविणार्या ३३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
महावितरण कंपनीच्या तालुक्यातील खेड व लोटे उपविभागीय कार्यालयांतर्गत येणार्या ग्राहकांकडून वीजबिलासह मागील थकबाकी मार्च अखेरपर्यंत भरणा करण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी कंबर कसली आहे. वसुली पथकाने गेल्या दोन आठवड्यात ७० हजार रुपयांची थकबाकी असलेल्या ३३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तालुक्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी, दिवाबत्ती, सार्वजनिक पाणीपुरवठा व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील ७३८४ ग्राहकांकडे २ कोटी ५३ लाखांची वीजबिलांची थकबाकी आहे. यातील खेड उपविभागांतर्गत येणार्या ४०८४ ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख तर लोटे उपविभागांतर्फत ३३०० ग्राहकांकडे १ कोटी २१ लाखांची थकबाकी आहे.www.konkantoday.com