
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला
*__ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याची घटना घडली आहे. रत्नागिरी शहरातील शांतीनगर-रसाळवाडी येथील तरुणी ओबीसी ऑनलाईन फार्म भरण्यासाठी घरातून गेली होती रात्री पर्यत परत आली नाही म्हणून तिचा शोध घेतला असता तरुणीचा मृतदेह कुवारबाव येथील गणेशनगर- आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वेब्रीज च्या ट्रकवर आढळला. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.रिया रावसाहेब रणदिवे (वय १८, रा. रसाळवाडी- शांतीनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.१८) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिया सायंकाळी घरातून मैत्रीणीचा ओबीसीचा ऑनलाइन फार्म भरण्यासाठी जाते असे सांगून गेली होती. रात्री आठ वाजल्यानंतरही ती घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिच्या मित्र-मैत्रीणींकडे इतरत्र शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर रियाचे वडिल रावसाहेब पोपट रणदिवे यांनी कुवारबाव पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर रियाचे वडील व कुवारबाव पोलिस चौकीतील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड, श्री. तटकरी यांनी कुवारबाव परिसरात शोध सुरु केला. शोध सुरु असताना रात्री सव्वा अकराच्या सुमुरास तिचा मृतदेह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रेल्वे ब्रिज जवळील ट्रॅकवर मान व धड वेगळे झालेल्या स्थितीत रियाचा तिचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाwww.konkantoday.com