आर एच पी फाउंडेशनतर्फे वर्षाराणी सावंतला दिली व्हीलचेअर
_रत्नागिरी:कु.वर्षाराणी श्रीपत सावंत( वय ३४ वर्ष मु.पो.निर्वाळ बहीरीचीवाडी ता.चिपळुण जि.रत्नागीरी)हीला आरएचपी फाउंडेशन रत्नागिरीतर्फे व्हीलचेअर देण्यात आली.व्हीलचेअर दिल्याबद्दल वर्षाराणीच्या आईवडीलांनी आणी तिच्या कुटुंबीयांनी आरएचपी फाउंडेशनचे विशेष आभार मानले.वर्षाराणीला वयाच्या २१ व्या वर्षापासुन मस्कुलर डीस्र्टोफी या अजाराने अपंगत्व आले.हळुहळु अंगातली सर्व ताकद कमी कमी होवु लागली, बॅलन्स जावु लागला, पायाचे जॉईन्ट्स दुखायला लागले तसे चालणेही कमी झाले.हातात काठी घेवुन चालत होती. तशा परिस्थीतीतही ग्रॅज्युएशन पुर्ण केले.आता घराबाहेर पडता येत नाही.घरातल्या घरातच हळुहळु स्वत:ची कामे करते.बर्याच कामात आईची मदत लागते.वडील श्री.श्रीपत गणपत सावंत मिलेटरी रिटायर्ड आहेत.आई नंदा श्रीपत सावंत गृहीणी आहे.मोठे दोन भाउ आहेत त्यांची लग्न होवुन ते कामानिमित्त मुंबईत सेटल आहेत.गावी वर्षाराणी आणी तिचे आईबाबाच रहातात.घर तिच्यासोयिचे करुन घेण्याचे काम सुरु आहे.वर्षाराणीला आता चालणे सहज शक्य नसल्याने घरातच बसावे लागते.तिला बाहेर दवाखान्यात ने आण करणेसाठी व्हीलचेअरची गरज होती.तिच्या ओळखीच्या अशोक भुस्कुटेसरांनी आर एच पी फाउंडेशनचे अाध्यक्ष श्री सादीक नाकाडेंची माहीती सांगीतली.त्याप्रमाणे तिच्या घरच्यांनी श्री सादीक नाकाडेंशी संपर्क साधुन वर्षाराणीची संपुर्ण माहीती दिली आणी व्हीलचेअरची मागणी केली.श्री सादिक नाकाडेंनी व्हीलचेअरसाठी अवाहन केले होते.त्या अवाहनाला साद देवुन रत्नागीरीच्या पी डब्ल्यु डी मधे कार्यरत असलेल्या सौ.वैशाली नारकर यांनी मदतीचा हात पुढे केला.त्यांनी त्यांचे वडील कै.मुकुंद राम गांधी यांच्या स्मरणार्थ व्हीलचेअर डोनेट केली.व्हीलचेअर वाटप करते वेळी सौ.वैशाली नारकर,भाउ संकेत मुकुंद गांधी,तन्वी विश्वास खातु,आरएचपी फाउंडेशनचे आध्यक्ष श्री सादीक नाकाडे,सदस्य श्री समीर नाकाडे,प्रिया बेर्डे तसेच वर्षाराणी सावंत, अशोक भुस्कुटेसर उपस्थीत होते.Www.konkantoday.com