
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली जवळ मुंबई गोवा महामार्गावर महामार्ग ओलांडत असताना कारची धडक बसून एकाचा मृत्यू
_सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली जवळ मुंबई गोवा महामार्गावर महामार्ग ओलांडत असताना कारची धडक बसून श्रीधर सर्पे (वय ६५, रा. कसवण बौद्धवाडी ) यांचा मृत्यू झाला. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी डस्टर कार चालक प्रशांत शंकर कांबळे (वय २३, रा.आवळी बुद्रूक, ता. राधानगरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चालक प्रशांत शंकर कांबळे हा डस्टर कार (एमएच ०९ डीएक्स ३९३९) मुंबई ते गोव्या दिशेने जात होता. महामार्गावर ओसरगाव पटेलवाडी येथे कारची रस्ता ओलांडणाऱ्या श्रीधर गुणाजी सर्वे यांना धडक बसली. यात सर्पे यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी मदतकार्य केले. अपघातानंतर धडक दिलेल्या कारमधून त्यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मयत श्रीधर सर्पे यांचा मुलगा ओंकर सर्पे (वय १९) याने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.www.konkantoday.com