
शिमगोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली अहमदाबाद-मडगांव होळी स्पेशल गाडी धावणार
शिमगोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली अहमदाबाद-मडगांव साप्ताहिक होळी स्पेशल १९ मार्चपासून धावणार आहे. वसईमार्गे धावणार्या २२ डब्यांच्या स्पेशलमधील बोरिवली, विरार, वसईस्थित चाकरमान्यांची गावी येण्यासाठी होणारी यातायात काही अंशी कमी होणार आहे.०९४१२/०९४११ क्रमांकाची अहमदाबाद-मडगाव साप्ताहिक होळी स्पेशल १९ ते २६ मार्चदरम्यान धावेल. अहमदाबाद येथून सकाळी ९.३० वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगाव येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात २० ते २७ मार्चदरम्यान धावणारी स्पेशल मडगांव येथून सकाळी ८ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता अहमाबादला पोहचेल. स्पेशल वडोदरा, सुरत, बलसाड, वापी, पालघर वसई, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकात थांबणार आहे.www.konkantoday.com