वणव्यामुळे कोकणातील निसर्गसंपदा काळवंडतेय
नैसर्गिक सौदर्याची देणगी लाभलेल्या कोकणातील चिपळूण तालुक्यात यावर्षीही वणव्यांचे ग्रहण कायम आहे. मानवनिर्मित या भयंकर कृतीतून डोंगरच्या डोंगर, दर्याखोर्यांसह रानमेवा, आंबा, काजू, बागा आगीच्या भक्ष्यस्थळी सापडून होरपळत आहेत. शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. वणवामुक्त गाव ही संकल्पना केवळ कागदावरच शिल्लक राहिल्याने आज इथली मोठी निसर्ग संपदा या वणव्याच्या हल्ल्यात पुरती काळवंडत चालली आहे. वन विभागासहीत प्रशासनाने वणवे लावणार्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत नियोजन केले असतानाही वणवे लावण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता त्यावर सामुहिकपणे नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. www.konkantoday.com