लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर एका चार चाकी गाडीत दहा लाखाची रक्कम आढळल्याने खळबळ

*लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर एका चार चाकी गाडीत दहा लाखाची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे.स्थिर सर्वेक्षण पथक (एस.एस.टी.) व पोलिसांनी आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली.दरम्यान, ही रक्कम बांधकाम व्यावसायातील असल्याचा दावा संबधित व्यावसायिकाने केला आहे. मात्र, याची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून, रक्कम बेहिशोबी असल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका चारचाकीची तपासणी फोंडाघाट तपासणी नाक्यावर मंगळवारी पोलिसांनी केली. त्यावेळी त्या गाडीमध्ये १० लाखाची रक्कम आढळून आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button